Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Mina Shelke

Inspirational

3  

Mina Shelke

Inspirational

अभंग

अभंग

1 min
7.5K


जीवा लागे ध्यास । पांडुरंग आस

चाले पदन्यास । पंढरीसी


विठ्ठलाच्या भेटी । कैवल्याची ताटी

पंढरीच्या वाटी । वारकरी


श्रद्धा ,भक्ती, दान । त्रिवेणी संगम

आषाढी हंगाम । एकादशी


नसे भेदभाव । जातपात धर्म

एकजूट कर्म । समभाव


वैष्णव पताका । पुंडलिक हाती

जोडूनिया नाती । सकळिक


मुखी हरीनाम । सोबतीला राम

मोहमाया , काम । सांडूनिया


भक्त मांदियाळी । बांधूनिया चाळ

अश्वारूढ बाळ । ज्ञानेश्वर


वहिवाट जुनी । माऊलींच्या भेटी

संताची रहाटी । जागोजागी


इंद्रायणी तटी । देवाची नगरी

पुण्यांच्या डगरी । चढियेल्या


नाम्याची पायरी । चरणाची धूळ

मिटवितो शूळ । पदस्पर्श


कळसी बसला । बघा तो सावळा

पाहतो सोहळा । आपुलाचं




Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational