STORYMIRROR

अपर्णा ढोरे

Inspirational

3  

अपर्णा ढोरे

Inspirational

चौकट

चौकट

1 min
14K


लहानपणापासून बघतेय मी एक चौकट,

चारही बाजुंनी बंदिस्त,मजबूत कुंपणासारखी।।

आजी,आई,काकू,मावशी साऱ्याच जणी अगदी सगळ्यांनीच वापरली ही चौकट,

मर्यादेची, रितीरिवाजाची,परंपरेची चौकट,

चौकटी बाहेर पाऊल ठेवणे महा भयंकर वाटे समाजाला,

स्त्रीला चौकटीत बांधून ठेवणे सोपे गेले असावे कदाचित,

एखाद्यावेळी ठीक आहे पण नेहमीच ही चौकट बांधून ठेवायला जेव्हा लागते,तेव्हा ती नकोच असं वाटू लागतं.

आणि ही चौकट जेव्हा अतिजाचक ठरते,तेव्हा तिच्यातील माया,ममता,काळजी ,आस्था सारं सारं नकली वाटायला लागतं.

शालीनता, सभ्यता अशी मोठमोठी नावे या चौकटीतच जन्माला आली.

स्त्री पुरती यात दबून गेली.

म्हणूनच वाटतं लांघून द्यावी ती चौकट,मुक्तपणे अन प्राकृतिक जगावे विना चौकटीचे!!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational