STORYMIRROR

अपर्णा ढोरे

Classics

3  

अपर्णा ढोरे

Classics

मेंदी

मेंदी

1 min
14.4K


मेंदीच्या स्पर्शाने, कर रोमांचित झाले,

रात्रभरातील जादूने कसे लालेलाल झाले।।


हिरवी गार मेंदी तनुस शीतलता आणी,

प्रेमळ, सुखद भारी हिच्या आठवणी।।


मेंदी रचता हातावर नववधू लाजे,

सोन्यापेक्षा तिज, ही मेंदीच साजे।।


साधीसुधी मेंदी कशी समानता आणी,

गरीब, श्रीमंत असा भेद उरत नसे मनी।।


तिच्याविना अपुरे बघा सगळे सोहळे,

आनंदती सारे नकळत भावबंध जुळे।।


मेंदीची किमया, ठाऊक अपुल्या कुंतले,

लांब घनदाट केशसंभार तिच्यामुळे जाहले।।


सानथोरा हिची खरेच भारी आवड

रेखण्यास मात्र काढावी लागते सवड।।


देशात प्रिय हिचा मुक्त स्वैर संचार,

मेंदीमुळे होई आपुल्या संस्कृतीचा प्रचार।।




Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics