STORYMIRROR

अपर्णा ढोरे

Others

4  

अपर्णा ढोरे

Others

पाऊस

पाऊस

1 min
41.4K


धरती आणि आभाळ

मिलनासाठी आसुसली,

दूर राहून एकमेकांच्या

प्रेमासाठी तरसली।।


पुत्र त्यांचाच पाऊस

बापापाशी रहायचा,

चार महिने तो खाली

आईपाशी यायचा।।


मातेच्या ओढीने

पाऊस होई उतावळा,

चार महिने रहायचा

म्हणून तो पावसाळा।।



मेघधारा खाली येती

मस्त वाजतगाजत,

पिता आभाळही मग

खुश व्हायचा बघत।।



वात्सल्याचे अश्रू

वाहती सरी होऊन,

धरणीमाय ममतेने

जाई चिंब भिजून।।



आंनद होई तिला

पुत्र बघता समोर,

वात्सल्याने भिजून जाई

तिचा विशाल पदर।।


माय लेकाची भेट

वरून पाही आभाळ,

पाझरती नेत्र त्याचे

ढगांच्या हो आड।।


धरामाय संगे राहून

पाऊस करायचा मौज,

छोट्या छोट्या कोंबासंगे

तो खेळायचा रोज।।


सृष्टीची ही हिरवाई

त्याला आवडे खूप,

बदलून जाई त्याच्यामुळे

धरामायचे रूप।।


पाऊस आला नाही

तर माय कोमेजून जाई,

केविलवाण्या नजरेने

ती आभाळाकडे पाही।।


आईसाठी तरी पावसा

तू खाली येत जा,

बाकीचे आठ महिने

बापाकडे रहात जा।।


Rate this content
Log in