STORYMIRROR

rahul gawande

Inspirational

3  

rahul gawande

Inspirational

पर्व

पर्व

1 min
14.5K


दिसले कधी ना हे पर्व

हरवले ते सर्व

मानवा कारे तुला गर्व

तुझं तर आहे हे सर्व ॥ १ ॥


किमया ही अधोरेखित जीवनाची

स्पंदन का बावरी मनाची

निर्लज्ज तुला वासना तनाची

त्यासाठी इज्जत न केली तू स्त्रियांची ॥२॥


हे पर्व तुझेच रे

बदल घडव आपुल्या स्वतःत रे

नको तुज विचार अहंकारी

सदाचार बनव तु आपुल्या अंगी ॥३॥


निष्ठा असू दे सत्संगी

ज्ञानी विचार मनी वसू दे

चित्त तुझ स्थिर असू दे

अन् अन्यायाच्या लढ्यात फक्त तू दिसू दे ॥ ४ ॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational