STORYMIRROR

rahul gawande

Others

3  

rahul gawande

Others

जीवनयात्रा

जीवनयात्रा

1 min
28.3K


या भयाण काळोख रात्री ची

मी साक्ष देत आहो

हे जीवना आता तु कुठे नेतो

मी तया ची वाट पहात आहो.....१


नको तुह्या गांभीर्यचा कळस

उरी प्रकाशाची लाट आहे

हे जीवन असेल नश्वर

पण ईश्वर असल्याचा भास आहे .....२


काळजात किती वार झाले

तरी उमेदीत तुया वास आहे

मनाला जिवंत ठेवुणि

तुझाच हा श्वास आहे .......३


कुठंतरी पालवी फुटेया

असा निसर्गाले विश्वास आहे

भाकीत देते कुणी मुखातून

त्याला पण तुझा आशीर्वाद आहे ....४


कुठे लपून हा संसारी खेळ खेळी

तुझीच अजाण ही किमया आहे

आम्ही अहंकारी पाशात गुरफटून

भोगाच्या साच्यात आकार घेत आहे .....५


ना -ना विकारात वेढुणि

जगण्याची किम्मत ठरवित आहे

मोल नसले तरी या साक्षात्काराचे

तरी मना खोटा आनंद देत आहो ......६


थरथरत्या हाताला पुन्हा

मोकळे करत आधार देत आहे

गजबजलेल्या या दुनियेत

मोकळे रान दिसत आहे .....७


मिटतील डोळे तरी श्वास

तुझ्या दाणात दिले आहे

शरीर तुझे असेल तरी

या मातीच्या कवेत गेलेे आहे ...८


Rate this content
Log in