STORYMIRROR

rahul gawande

Inspirational

3  

rahul gawande

Inspirational

सलाम सैनिक हो

सलाम सैनिक हो

1 min
14.7K


देशाच्या वीर जवानांनो

लढवय्ये या मातीचे

बलिदान व्यर्थ ना जाई तुमचे

शाश्वत बलाढ्य तुम्ही या राष्ट्राचे

सलाम .......


कर्तुत्व तुम्ही या भूमीचे

तुम्ही या तिरंग्याची शान रे

नतमस्तक आम्ही जव -तव

फेडूनी पांग या देशाचे रे ...

सलाम .....


प्राणाची देऊन आहुती

रक्षले तुम्ही आम्हासी

ज्या मायेनं हे वीर उपजले

नमन अश्या मातेसी ....

सलाम .......


उरी बाळगूनी शस्त्र एवढी

केली पर्वतीय स्वारी

लढ्यास नेहमी कटिबद्ध तुम्ही

नेहमी सज्ज या वारीसी ...

सलाम ......


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational