STORYMIRROR

राहूल धनराज गावंडे

Others

3  

राहूल धनराज गावंडे

Others

उपद्रव

उपद्रव

1 min
412

मनाच्या उंबरठ्यासी नजरेचा दोष लागला 

बघ रे देवा, तुझ्या मानवाला उपद्रवाने डंख मारला... 


उपद्रवी संसारजन्य पशू-पक्षी समान झाला 

सत्य वाणीच्या मानवाला लागलाय ताला...  


अंतःकरणची खिंडगी करुन पाहे 

भस्मासूर येथे मदमस्त होऊन वाहे...  


प्रत्येक क्षेत्र पैशाअभावी बेजार 

पैसा फेकून येथे भेटतात हजार...  


नाद अचंबित होऊन आता पुरूषार्थ हिणवतो 

मानव मानवास विकत घेण्यास धन जमवतो...  


अस्पृृश्य होऊन नाती दुरावली जातात 

उकिरड्यावर बसून फक्त स्वार्थ खातात...  


आज फिकरीस उद्याचा क्षण वाटे मोलाचा 

मोठमोठे बोल बोलून फक्त शब्द तोलाचा...  


आपुली मजल कुणी मारू नये, याचीच त्याला भ्रांत  

दुसऱ्याचे उष्टे शिकून, हात पुसून बसतोय शांत...  


आता उगाचच वाटे, ही दुनिया रंगीन आहे

भाऊ जीवन जगा समजते, मामला संगीन आहे...


Rate this content
Log in