स्वार्थ अवडंबर
स्वार्थ अवडंबर
हे स्वार्थ अवडंबराने
ग्रासलेल्या रक्तपिपासू
गोचूळा सारखंं चीपकुन
मनाचा बनू नकोस जिज्ञासू ..१
ढोंगीपणा क्रूर मानवास
दंश करूनी विनाशकाचा
स्वार्थ पिंजून मानवी देह
करी खेळ फक्त मतलबाचा ...२
सोड या मानव संसारीस
नाते अवघड होई प्रत्येकी
जगणाऱ्या त्या निःःस्वार्थतेस
सर्वत्र त्रास मिळे कित्येकी...३
तुझ्या अवडंबराने सर्वत्र
पोखरून टाकली व्यक्तित्व
माखून निरनिराळे चेहरे
फक्त स्वार्थ पुरते देई महत्व...४
विश्वास पोकळ करूनी
माज फक्त स्वार्थपुरता
अरे जगुनी असे मानवा
नष्ट नको करू बंधूशीलता...५
ज्या मातीने जन्म दिला
ती निःस्वार्थ भावनेची
माय ममत्व निसर्ग हे
जिवंत ठेवी तुला स्वार्थ विरहाची...६