दुनियादारी
दुनियादारी
1 min
14.9K
अजब या प्रेमाची
गजब ही कहाणी
पैज लागते नाण्याची
किम्मत फक्त सोन्याची ...१
कटू हा खेळ
अनं घटकाभरचा वेळ
साथ सांगे सदैवाची
अनं क्षणात सर्व विसरण्याची..२
भाळला हो जीव
अस्वस्थ करून मनाला
वरून दिसतो टवटवीत
पण पोखरला हो जीवनाला...३
काळीज आसवं गाळून
रडे क्षणा -क्षणाला
सोडू कुठे आतातरी
या निपजलेल्या आसवाला....४
यारीत किती ही टाळले,
भावनिक जीवनवारीला
तरी साथ सोडू न देई
या बेमान दुनियादारीला... ५
