STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Inspirational Others

3  

Meenakshi Kilawat

Inspirational Others

उंबरठा

उंबरठा

1 min
14K


नव्हताच ग तुला अधिकार

तू होतिस एक निर्बल अबला 

किती यातना घोर भर्सना

त्यातून तू उंबरठा ओलांडला  //१//


नवे क्षितिज गाठण्यासाठी

तत्पर तू सदैव रहात आले

नाही काही करता आले तरी

अपुल्या मुलांना तू घडविले    //२//


पंख छाटूनी केले तूला निपंख

बाळपणात ही केले तुला त्रयस्त

परी न घाबरता परक्यांसाठी

बोहल्यावरी चढलीस तू बिनधास्त //३//


संसारात करूनी साऱ्यांची सेवा

स्त्री होवूनी या सीढी चढली 

स्त्री-पुरूषाची मर्यादा ठेवूनी

जगी स्वंयसिद्धा ची ओळख दिली //४//

  

माया,ममता,वात्सल्यात वाहूनी

देते कधी अस्तित्वाची तू बली

पण भरोसा असे उंबरठ्यावर मनी

असणार नाही ही रिकामी झोळी //५//


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational