STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Tragedy

4  

Meenakshi Kilawat

Tragedy

शूर संभाजी

शूर संभाजी

1 min
26.8K


बलीदान एका वीर पुत्राचा

रक्त रंजीत होवूनी लढा दिला

जसा तळपता सुर्य होवोनी

योध्दा शूर संभाजी लढला।।


होती महाराष्ट्राची शान

अमुल्य तयाची तलवार

एक योध्दा रक्तात चिंब

परी न माने तो सरदार।।


लढवय्या शूर वीर संभाजी

परी उगारली त्याने तलवार

धोका देवूनी केले तया निशस्त्र

मुगल शत्रृने केले लाचार।।


पराक्रमी तेजस्वी वीरांच्या

पाठीत केला शत्रृने हा वार

अवहेलना करूनी संभाजीची

केले वीर गाथेला अजराअमर।।


पराक्रमी तेजस्वी संभाजीला

थरारले होते शत्रृ कंटक फार

करूनी घेराव टाकला जाळ

साधूनी डाव केला अत्याचार ।।


शत्रूमर्दनास मागेपुढे न पाहता

दुष्टांचा संभाजी होता कर्दनकाळ

लाल रक्ताची उडाली हो धार

रक्ताने माखली धरा ही लाल।।



विषय का मूल्यांकन करें
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy