STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

3  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

गीत पर्यावरणाचे - गीत.

गीत पर्यावरणाचे - गीत.

1 min
14.4K


गीत निसर्गाचे गाऊ या

झाडेच झाडे लाऊ या

फळ, फुले पिकवू या

निसर्गाला सजवू या

आनंद जंगलांचा लुटू या


पक्षी, प्राण्याची सोबत करू या

गीत आनंदाचे गाऊ या

मजाच मजा करू या

गीत निसर्गाचे गाऊ या


ध्वनी प्रदुषण रोखू या

बहिरेपण थांबवू या

जल प्रदूषण रोखू या

पाण्याचे आजार पळवू या

गीत निसर्गाचे गाऊ या


वायु प्रदूषण रोखू या

जीव सृष्टीला वाचवू या

आरोग्यमान उंचाऊ या

सुंदर जीवन जगु या

गीत निसर्गाचे गाऊ या


शाळा, शाळेत जाऊ या

खेड्या, खेड्यात जावू या

डोंगरावर फिरू या

ओसाड जमीन पाहू या

गीत निसर्गाचे गाऊ या


झाडेच झाडे लावू या

त्यांचे जतन करू या

नाते त्यांच्याशी जोडू या

पर्यावरण शुद्ध राखू या

गीत निसर्गाचे गाऊ या


निसर्गाची पूजा करू

झाडाला देव मानू

खत, पाणी वेळेवर देऊ

आयुष्य त्यांचे वाढवू

गीत निसर्गाचे गाऊ या .


निसर्ग मानवा वरदान

एक एक रोपटे घेऊन

करू या वृक्षारोपण

जन्माचे सार्थक करुन

गीत निसर्गाचे गाऊ या .


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational