Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sangeeta GodboleJoshi

Inspirational

4.7  

Sangeeta GodboleJoshi

Inspirational

कोव्हिड डेज

कोव्हिड डेज

2 mins
570


श्वासागणिक कमी होणारं कुणाचंतरी आयुष्य ..

अँम्ब्युलन्सचे जीवघेणे ..

दिवसाला आठ दहावेळा 

काळीज भेदून जाणारे ..

भिवडवणारे आवाज ..

गेले सात महिने ..

रोजचंच होऊनही ..

सवय न होता ..

अधिकच भीषण वाटू लागतात .


सहा आठ फोन ...


याला बेड हवाय ...


याला इंजेक्शन्स ...


सगळं ठीक होईल ना?

 

समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यातली भीती ..

फोनमधूनही ...

स्पष्ट दिसते ...


हो ..हो ...

घाबरायचं नाही ...

आपण कोणाचं वाईट नाही केलं ..

मग आपलं कशाला होईल? 

समोरच्याबरोबर ..आपल्याही मनाची समजूत ..

आपणच काढायची ..हसू पेरत ..


कोव्हिड योद्धा .. म्हटलं की आलंच हे सगळं ओघानं ..


हा गेला ...


तो व्हेंटिलेटरवर ...


आवंढे गिळायचे ..

नि पुन्हा एकदा ..

ऑल इज वेल ..

म्हणत नव्या दमानं 

सिद्ध व्हायचं ..त्याच कामासाठी ..

डॉक्टरनं घाबरायचं नसतं रोगाला ..

लढत रहायचं शेवटपर्यंत ..रोग्याच्या ..

किंवा ..

स्वतःच्या शेवटच्या श्वासापर्यंत


'चांगला डॉक्टर' होण्याचं स्वतःचं आणि आईबापाचं स्वप्न पुरं करण्यासाठीची 

किंमत नक्की कशात करायची? 

नक्की कशात मोजायची?


पैसा? वेळ? समाधान? एकाकीपण? सारं करुनही यश न मिळाल्याबद्दलचे कुणाचे शिव्याशाप? 


की आपलं ..आयुष्य?...


प्रत्येकाचं आभाळ ज्याच्या त्याच्या खिडकीतून पहाण्याची मुभा ..

असतेच तशीही ...

फक्त ...

सारं आकाश तिथेच कोंबण्याचा ..

अट्टाहास सोडता आला की ..


जीवनाचं सार्थक बिर्थक ..

आपल्या मागे कोणी म्हणोत.. न म्हणोत ..


हेच सत्य आहे असं 

मानू देत अथवा नाकारू देत ..

आपलं समाधान ..

आपल्या बरोबर वागवत रहायचं ..

मग ..

ऑल इज वेल ..

नियमित पडणारे छातीचे ठोके अन् ..

छातीभर वावरणारा श्वास ..

दिलासा देत रहाणारच ..

तीच तर धडपड ..

आत्मिक समाधानाची ..


कर्कशपणे वाजणारा अँब्युलन्सचा हॉर्न ..

कुणाचातरी जीव वाचवण्यासाठी धडपडतोय ..

सनईच्या मंजुळ सुरांपेक्षाही हा आवाज अधिक सुरेल वाटू लागलाय आता ..

कुठलंच स्केल नसतानासुद्धा


तेव्हा ..या आवाजाचं भय न बाळगता ..

नव्या प्रश्नाचं स्वागत करायचं अन्.. दूरवर जाणारा तो आवाज ..

आपल्या आतल्या आवाजाला 'लढण्याचा' खो देऊन गेलाय ..आता जीवापाड प्रयत्न करत धावत रहायचं ..आउट न होण्यासाठी ..

याचं भान ठेवायचं ...


संतुलित ...

शांत मन ...

आतला आवाज ऐकू शकतं ...

अन् या घडीला ...

तेच जमवायचं ...

अस्तित्वासाठीची धडपड ...

यशस्वी व्हायलाच हवी

कर्माचा सिद्धांत ...

कर्मयोग ...

आजोबांनी शिकवलेल्या भगवद्गीतेचे श्लोक जगण्याची संधी ..

हाच तर अलभ्य लाभ ..


Rate this content
Log in