STORYMIRROR

Sangeeta GodboleJoshi

Others

4  

Sangeeta GodboleJoshi

Others

नातं तुझं माझं

नातं तुझं माझं

1 min
548

तुझ्या माझ्या नात्यात 

काही टिकाऊ आहे 

की सारंच टाकाऊ झालंय

या संभ्रमात

अनेकदा कागदावर रेखाटलेलंही

पुसून टाकते मी कित्येकदा

मनाचं कॅनव्हास कोरं करून

नात्यांची उकल व्हावी 

याकरता

उगीचच रेघोट्या मारत रहाते


सुटण्याऐवजी

गुंता वाढत चाललाय


मी जितकी चिंब भिजत चाललेय

तितकाच तू कोरडा होत चालला आहेस

असं मला वाटणं

हे खरं

की, हा माझा भ्रम?


हा संभ्रम

दूर करावासा वाटलाच तर


उरलेल्या श्वासांचं ओझं 

होण्याआधीच

एकवार हाक दे


सखी म्हणून 


Rate this content
Log in