STORYMIRROR

Sangeeta GodboleJoshi

Others

4  

Sangeeta GodboleJoshi

Others

मैत्रफुले

मैत्रफुले

1 min
357

स्वप्नांचं जग आभासी असतं,

तरीही काही क्षण ते सत्य भासतं,

सारेच आभास, फक्त आभास नसतात...

व्हाॅट्सअॅपमधील मैत्रीवरही

असाच आभासी असल्याचा

आरोप केला जातो,

पण त्याच माध्यमातून लाभलेली

काही मैत्रफुलं...


ती फुलं टपटपत राहतात

केशरी रंगाच्या 

नाजूक देठाच्या

मंद सुवासाच्या 

शुभ्र प्राजक्तासारखी...

काही सोनचाफ्यासारखी...

सुवर्णकांतीचं वरदान लाभलेली राजस...

अन् तरीही त्या राजस रूपाचा अहंकार नसलेली, हलक्याशा वाऱ्याच्या मंद झुळुकांबरोबर...

स्नेहसुगंध पसरणारी...


'मैत्रफुलांच्या' निर्मितीची प्रक्रिया,

अचानकच होते...

कोणत्याही निर्मितीसारखीच,

नकळत्या क्षणी...

ती फुलते मात्र हळुवार,

तिला सुकण्याचा शाप नसतो...

त्याचा मनात दरवळणारा सुगंध...

आपल्यासाठी असला आणि लपवला...

तरीही येतोच...

हिरव्या चाफ्यासारखा...

अन् मग अशाच एखाद्या भावविभोर क्षणी

मैत्रफुलांचं बनच भेटतं नि सारं आयुष्य...

मैत्रबन होऊन जातं...


Rate this content
Log in