STORYMIRROR

Sangeeta GodboleJoshi

Classics Others

3  

Sangeeta GodboleJoshi

Classics Others

रांगोळी

रांगोळी

1 min
373


बाई पहाटेच्या वेळी दारी रांगोळी काढते 

कुंकू हळद चिमुट रंग सुखाचे भरते


बाई टिपके टिपके एका ओळीत मांडिते

जणू माणसे माणसे नाती जोडित रहाते


बाई रेष रांगोळीची सदा रेखीव काढते 

जणु आयुष्याचे मर्म एका ओळीत सांगते


बाई स्वस्तिक रेखिते बाई शंखही रेखिते

ईडा पीडा दुःख सारे दाराबाहेर ठेविते


रांगोळीच्या रेषा वक्र गोलाकारही काढते 

बाई संसाराचा तोल प्राणपणाने जपते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics