STORYMIRROR

Sangeeta GodboleJoshi

Action Others

3  

Sangeeta GodboleJoshi

Action Others

नेमके काय आहे?

नेमके काय आहे?

1 min
364

लेखणीत हातामधल्या

 नेमके काय आहे 

नेटका शब्द एखादा 

वा तलवार दुधारी आहे


पापण्यात मिटल्या दोन्ही 

नेमके काय आहे 

आसवात भिजले आठव

की स्वप्न कोवळे आहे


 मिटलेल्या अलगद ओठी 

नेमके काय आहे 

आर्त कथा कोणाची

की गीत उद्याचे आहे ?


घनगर्द मिट्ट काळोखी

 नेमके काय आहे 

आक्रोश कुण्या अबलेचा

की सृजन सोहळा आहे


कवितेच्या लिहिण्यामागे

नेमके काय आहे 

नुसत्याच रम्य कल्पना की 

मन उघडे करणे आहे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action