Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Sangeeta GodboleJoshi

Others

4.6  

Sangeeta GodboleJoshi

Others

ते माझे घर

ते माझे घर

1 min
436


घराची चौकट ..

आल्या गेल्याच्या स्वागताला सदैव आसुसलेली ..

दारावरचं तोरण ..

मांगल्याच्या क्षणांचं द्योतक .

दारापुढच्या रांगोळीत ..

कलाकुसर ..

आखीव रेखीव रेषा .

कधीकधी 

त्यात भरलेले रंगही .


सारवलेल्या अंगणातलं 

तुळशी वृंदावन ..

त्यातली तुलसीमाय..

घरातल्या साऱ्या सुखदुःखांची साक्षीदार .


उंबऱ्याची मर्यादा आईनं प्राणपणे जपलेली .


माजघरातल्या गोष्टी ..

माजघरातच ..

मनाच्या गाभाऱ्यात जपून ठेवलेल्या .


बाहेरच्या खोलीत ..

ये जा असली तरी ..

प्रत्येकाच्या वावराची मर्यादा 

आखून दिलेली ..


स्वयंपाकघरात ..

प्रत्येकाच्या आवडीचं ..पण आळीपाळीने ..


निजायच्या खोलीत ..

दिवसभराच्या गोष्टी 

पुन्हा एकदा डोळ्याखालून घालायची ..

काय उरलं ..काय पुरलं 

काय चुकलं ,

काय राहून गेलं ..

सगळं ..सगळं ..

स्वतंत्रपणे आणि त्रयस्थपणानं अवलोकत रहायची .


परसदारची झाडं ..पानं फुलं ..उमलत्या कळ्या ..

सारंच तिच्या हृदयाजवळचं ..


सगळीकडे आईचा हात फिरलेला ..

वाटायचं ..

हे घर म्हणजे ..

आई ..


ती असेपर्यंत ..

सगळं कसं सुरळीत असतं नाही ?


घरानं ..सारं पाहून ठेवलेलं असतं ..

आईचं वावरणं .

तिचं सोसणं ..

तिचं श्रमणं 

तिची माया ..

तिचं कुणासाठी 

काळजी करणं ..

मुक्यानं प्रेम करणं ..

कुठल्याच अपेक्षेविना ..


आणि मग ..

एक दिवस ..

ते घरच होऊन जातं ..

कुशीत घेऊन ..

थोपटणारी..

'आई '


Rate this content
Log in