STORYMIRROR

Sangeeta GodboleJoshi

Others

3  

Sangeeta GodboleJoshi

Others

ती.. ती. अन् ती..

ती.. ती. अन् ती..

1 min
118

तिच्या पोटी 'ती' जन्मली..

असं तिनं बाहेर येऊन सांगितलं..

अन् बाहेरच्या वृद्ध 'ती'च्या कपाळावरची आठी निरोप सांगणाऱ्या 'ती'नं अचूक टिपली..

हसत हसत ती म्हणाली देखील..

तिची सुटका करणारीही 'ती'च आहे ना? 


मग या नव्या 'ती' च्या स्वागताला..

हा असा दुर्मुखलेला चेहेरा नी खरचटलेलं काळीज का?

पहिल्या दर्शनालाच..

ओरखडे कशाला?

तेही 'ती' कडूनच?


तिनं दाखवण्यापुरती तरी का होईना..

कपाळावर इस्त्री फिरवली..

नी आत गेल्यावर..

गुलाबी कापडातली..

इवलीशी 'ती' पाहताना..

सारंच बदलून गेलं क्षणात..


तिनं बजावूनच टाकलं स्वतःला..

तिनं संतुलित असायला हवं

हा पुरूष.. ही स्त्री..

असा भेदाभेद न करता 

हा माणूस..

असं जेव्हा तिला पाहता येईल समोरच्याकडे,

तेव्हाच..

तिला हा मुलगा.. ही मुलगी..

असा भेदभाव टाळता येऊ लागेल..

पुढच्या पिढीच्या हाती 

संस्कृतीचा झेंडा आता फक्त 'माणुसकी'च्या रंगाचा द्यायला हवा..


अन् 'तिला'हे जमेल..

नक्की जमेल असं म्हणताना..

त्याच्यातल्या स्त्री तत्वालाही हे आव्हान आहे..

हे गृहितक..

सिद्धांतात बदलेल तेव्हाच..

संतुलित शब्दाचा खरा अर्थ सार्थ होईल..

अन् मग गुलाबी कपड्यात गुंडाळलेली 'ती' बोळकं पसरून पाहत राहिली..

त्या वृद्ध 'ती'कडे..

विजयानं..

स्त्री असूनही मिळालेल्या..

जगातल्या पहिल्या पावलातच..

एका 'ती'वरचा..

ती म्हणून होणारा अन्याय 

दूर झाल्याच्या आनंदात


Rate this content
Log in