वंदन महामानवाला
वंदन महामानवाला
वंदन महामानवाला
' पुष्पाग्रज '
कोटी कोटी वंदन माझे
वंदन महामानवाला,
भिमाने च बनविले
माणूस आम्हाला.
पशू समान होते जीने
गावकुसाबाहेर राहणे,
नव्हते हक्क, अधिकार
कैवारी तोच झाला...
दारिद्रयात खितपतलेला. वंचित पिडीत दीन दुबळा , होता सारा समाज अज्ञानी. उध्दार भिमाने केला...
कलंक मिटला अस्पृश्यतेचा मार्ग मिळाला परिवर्तनाचा,. संघटित होऊन संघर्ष करुया आला अर्थ जगण्याला......
अंधार फार काळ टिकत नसतो
सूर्य कायमचा मावळत नसतो,
महात्मे अमर विचार,कार्याने
भीम जगी कीर्तीवंत झाला...
शिका, संघटित व्हा, संघर्ष करा
केवढी मोठी ही शिकवण,
दीन दुबळ्यांचा वाली गेला
बाबा या पुन्हा जन्माला...
गायकवाड रवींद्र गोविंदराव दापकेकर
खरा सूर्य
" पुष्पाग्रज "
अज्ञानाचा अंधार नाही सूर्याने दूर झाला
म्हणूनच माझा हा भीम जन्मा आला .
त्याच्याच ज्ञान प्रकाशाने उजळल्या दाहीदिशा
केले स्वयंप्रकाशीत आम्हा,दूर झाली दशा.
वाघिणीचे दूध आम्हा भीमाने च पाजले
गुरंगुरंणारे वाघ इथे हे आज निपजले .
अस्पृश्यता केली दूर ,माणूस झालो आम्ही
नव्हता वाली कोणी सारी भीमाची च करणी.
दिला धम्म,न्याय,हक्क सारंच भिमाने
उध्दारले आम्हा झाले या जीवनाचे सोने.
जगात मोठी क्रांती केली भिमानेच खरी
अरे खरा सूर्य अवतरला हा या भूवरी .
त्या भीमसूर्याने साराच अंधार हा गिळला
अंधार झाला दूर आम्हा प्रकाश मिळला
या खऱ्या सूर्याने च सारे हे जग उजळले
अन् आम्हासाठी झाले खुले आभाळ हे निळे.
नाही जगी तोड त्यांच्या या महान कार्याला
अन् कोटी कोटी प्रणाम त्या खऱ्या सूर्याला.
गायकवाड रवींद्र गोविंदराव
दापकेकर जि.नांदेड.
किर्ती भिमाची...
किर्ती आहे भिमाची, साऱ्या या जगात
आहे भीम आज आमच्या कोटी ह्रदयात
जन्मूनी अस्पृश्य जातीत
भीम झाला कीर्तीवान,
होणार नाही जगी या
भीमासम इथे विद्वान.
दिली धम्मदीक्षा जगाला, पेटवून धम्म ज्योत...
काळाराम मंदिर प्रवेश
माझ्या भीमाने केला ,
कोटी जनांचा उध्दार
भीमामुळेच झाला.
दिले न्याय, हक्क, अधिकार,त्यांनी संविधानात...
अस्पृश्य, बहुजनांचा
भीमच खरा वाली ,
क्रांती खरी जगी या
भीमानेच मोठी केली.
बनविले माणूस आम्हा,होतो अंधारात...
परीवर्तन जगी या
भीमानेच खरे केले,
महामानवामुळे या
चवदार पाणी झाले
दिली क्रांतीची मशाल, आमच्या या हातात...
शिक्षण, संघटन, संघर्षाचा
मंत्र दिला आम्हाला,
झुकवून चरणी माथा,
करु वंदन भिमाला.
गाऊ आरती, पोवाडे,गाऊ या भिमगितं...
गायकवाड रवींद्र गोविंदराव
दापकेकर,जि.नांदेड
9834298315
