STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

दे हाक क्रांतीची...

दे हाक क्रांतीची...

2 mins
229

सरकार कशासाठी असतं नी काय करतं 

ते मला कळलंच नाही,

कारण हे सरकार करायचं सोडून नको तेच करताना दिसतंय...


सरकारला करायचा असता विकास

तर विकास करायचा उरलाच नसता

कारण किती वर्ष होऊन गेली स्वतंत्र होऊन देशाला...

एवढ्या वर्षात तो विकास

म्हातारा होऊन गेला असता...

विकास कशाला म्हणतात ते ही माहिती नाही इथे कोणाला,

सरकार देशासाठी असतं की

देशाला खायला ? 

पडलाय प्रश्न मोठा आम्हाला...


दिलंय इंग्रजांना हाकलून देशातून

पण ही त्यांचीच पिल्लावळं 

लुटतायत देश आजही

आपल्या मानगुटीवर बसून,

कळू द्या नी जागे व्हा,वाचवा देशाला 

ऊठा , ऊठा सारेच पेटून 


दारिद्रय, बेकारी, महागाई, गरीबी

तेंव्हाच झाली असती दूर 

नी नांदला असता देश

जात, पात, धर्म सारेच भेदभाव विसरून शांततेत 

तर राजकारणी लोकांच्या मागे शाल,हार घेऊन,

मिरवणुका काढत,त्यांचे ढोल वाजवत, कोण फिरलं असतं त्यांची चमचेगिरी करतं...


जाती, धर्माच्या नावावर दंगली घडवून

आपलाच बळी देणारे

असतात, नालायक हे राजकारणी

हे राजकारण ही कळायला हवं तुम्हाआम्हांला


स्वार्था पेक्षा मोठा नसतो देश

नी संपत्ती पेक्षा मोठ नसतं काहीच,

म्हणून घोटाळे, भ्रष्टाचार नी बेइमानी करून

झालेत सारेच राजकारणी अब्जाधीश, करोडपती

शंभर पिढ्यांची कमाई करुन

आता तर देशच विकायला निघाले आहेत साले...

ईडी,बिडी,काडी लावून

सारीच राख केली जात आहे...

घटनेचं राहीले नाही कामं

विरोधी पक्षच उरला नाही सारं कसं सोईन चालू आहे...

अच्छे दिन नी सबका साथ सबका विकास...


विकल्या जात आहेत कंपन्या, कारखाने नी देश ही

सारं सरकारी बंद पाडून, विकून

खाजगी नी कंत्राटीकरण सुरू झालंय,

पेन्शनच काय पगार ही द्यायची गरज नाही,

शाळा, दवाखाने,बस, बॅंका

सारं खाजगीकरण करून

सामान्यांचे जगनेच मुश्किल करून ठेवलंय इथे

संविधान ही धोक्यात असून दिसतं आहे 

हुकूमशाही नी विकायला बसले आहेत देशच.

हे देशद्रोही राजकारणी.

वाईट आहे काळ...

वाघिणीचे दूध असलेले शिक्षण

विकत मिळणेही कठीणच...


या साऱ्या तुघलकी कारभारात

आता झालाच आहे सारा खेळ खंडोबा..

हे कसं कुणास नाही कळत 

आता बसा सारे खेळत,

गौतमी नाचते शाळेत आणि हे गधं सरकार

ठेवतय पाळत ...


ज्ञानाचा तिसरा डोळा च काढून घेतल्यावर

उरेल सर्वत्रच अंधार नी अंधकार...

सावध नाही झालात तर होणारच आहे शिकार...

खरंच काळ वाईट आहे..

संपलंय सर्व काही

 ऊठ हाती घेऊन क्रांतीची पेटती मशाल 

वाचव देशाला नी स्वतःला ही

मिटव आजच उद्याचा काळाकुट्ट अंधार

देशद्रोही राजकारण्यांना संपवूनच...

घे शपथ मायभू भारतमातेची...

दे हाक क्रांतीची...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract