वीर जन्मणे थांबले का ?
वीर जन्मणे थांबले का ?
शूरवीरांची भूमी भारत
कूस इथली वांझ का
मातेच्या या उदरातुन
वीर जन्मने थांबले का
कूस इथली वांझ का?
उघडया डोळी अन्याय पाहतो
त्याचे काय मला पाठ दावतो ।
झिजला का कधि कोणासाठी
संकटे येता तू भीक मागतो ।।
स्वत:साठी तू बोलत नाही
मुस्कट तुझे बांधले का?!
मातेच्या या उदरातुन
वीर जन्मने थांबले का?
षंढपणाचा कळस जाहला
दोष देतो याला - त्याला ।
तुझी ताकत तूचं विसरला
शंका येते माणूस जन्मला ।।
रक्तावरची तहान तुझीतूतु , दुधावरचं
भागवशिल का?
मातेच्या
या उदरातुन वीर जन्मने थांबले का?
शूरवीरांचे पोवाडे गाती
होतसे काळी लाल माती
नजर वाकडी झाली शत्रुची
वीर योध्ये ते शीर छाटती
देऊन गेले हत्यार तुम्हाला,
हत्यार ते गंजले का?
मातेच्या या उदरातुन वीर जन्मने थांबले का
आठवं तुझीओळख जुनी
काय केले आपल्या पूर्वजांनी ।
रक्त उफाडु दे कीर्ति पाहुनी
मनाची मरगड टाका झटकुनी ।।
अन्यायाच्या विरुद्ध लढणारे, रणांगन असे शांत का?
मातेच्या या उदरातुन वीर जन्मने थांबले का !
मातेच्या या उदरातुन वीर जन्मने थांबले का !