STORYMIRROR

Prashant Shinde

Action Others

3  

Prashant Shinde

Action Others

तोल...

तोल...

1 min
176

कडी कधी अस वाटत

जग सार बॅलन्स्ड जीवन जगत

आपलंच घोड का सदा

सारख पेंड खातं

कितीही प्रयत्न केले

तरी घडी जीवनाची बसत नाही

एकही दिवस विवंचने शिवाय

कधी सरत नाही

त्रागा करून तरी काय उपयोग

म्हणून आता रागही येत नाही

निष्क्रियतेचे लेबल लागता

आता खंतही वाटत नाही

आळवावरच्या पाण्यासारखे

दिवस उमेदीचे सरून गेले

मृगजळा मागे धावून धावून

उराचे पुरते अनेक तुकडे झाले

पाहण्यारांनी पाहून घेतले

प्रत्येकाने हात धुवून घेतले

चांगलेच भाऊबंदकीचे बिगुल वाजले

संसाराचेही पुरते बारा वाजले

आता तारेवरच्या कसरितेचे

अप्रूप काही उरले नाही

चिंतेचे कारण जे होते

तेही आता शिल्लक राहिले नाही

तोल हा शब्द फक्त मला

आतून सावरायला खुणावत राहतो

म्हणून तर सारे विसरून पुन्हा

मी जीवनाचा नवा डाव मांडतो.....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action