STORYMIRROR

Prashant Shinde

Tragedy Classics

3  

Prashant Shinde

Tragedy Classics

मा.मनोहर जोशी...!

मा.मनोहर जोशी...!

1 min
5

तेवीस फेब्रुवारी 2024...!


आज मा.मनोहर जोशी यांचे निधन झाल्याचे वृत्त समजले आणि एक निर्मळ मनाचे व्यक्तिमत्व हरपल्याचे अतिव दुःख झाले.आम्ही सामान्य लोक तसा अर्थाअर्थी संबंध नसला तरी त्यांच्या स्वभावविशेष गुणांमुळे एक वेगळाच ऋणानुबंध निर्माण झाला होता त्यामुळे आपली जवळची व्यक्ती गेल्याची वेदना जाणवली.त्यांची राजकीय कारकीर्द सर्वश्रुत आहे पण मोकळ्या मनाची ,मोकळ्या स्वभावाची आणि सर्वांशी आपुलकीने स्नेहसंबंध जपणारी अशी प्रतिमा क्वचितच सांभाळली जाते पण जी यांनी जोपासली आणि खऱ्या अर्थाने आदर्शवत पणे वृद्धिंगत ही केली हे निर्विवाद सत्य कोणीच नाकारू शकत नाही. वैचारिक विरोधकही त्यांनी तितक्याच प्रेमाने जपले हे विशेष म्हणावे लागेल. अशा अष्टपैलु राजकीय व सामाजिक बांधिलकी कशी जपावी याचा आदर्श दाखविणाऱ्या मा.मनोहर जोशी यांचे चरणी ही भावपूर्ण श्रद्धांजली.ईश्वर चरणी चिरशांती लाभो हीच प्रार्थना...!

कै.मा.मनोहर जोशी.....!

कै क आले कैक गेले पण

मा न कोणा असा लाभला नाही

म ना मनात स्थान यांचे अढळ म्हणोनी

नो कर कोणाचा होणे जमले नाही...

ह सतमुखाने स्वागत करणे

र डणाऱ्यासही हसणे शिकविणे

जो जो येईल संगतीस त्याला

शी स्त लावणे कधी त्यांनी सोडले नाही...

     झाले बहु होतील बहु पण

     असा मनोहर पुन्हा वाटते दिसणे नाही

     अशी आपुलकीची प्रतिमा आपली साहेब

     जन्मोजन्मी स्मरणातून जाणे कदापी शक्य नाही...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy