STORYMIRROR

Prashant Shinde

Action Inspirational

3  

Prashant Shinde

Action Inspirational

तुला पाहता...!

तुला पाहता...!

1 min
11

तुला पाहता पूर्व क्षितिजी

येताना माझ्या सामोरी

जणू दिवाळी दसरा साजरा 

होतसे अवतरता तू माझ्या घरी...!

तेच ते चैतन्य रुपडे तुझे

उधळीत होते स्मित हस्याची कारंजी

जणू भासली टवटवीत फुगलेली मज

ती धुढट खरपूस खुसखुशीत तळणातली करंजी...!

पहाताच क्षणी कोणीही मोहात पडावे 

अनायसे प्रभातसमयी प्रसन्न चित्ताने

अन नजरेच्या कटाक्ष धारेवरी पेलावे वाटते

आलिंगुनी तुला हृदयस्थ वसत्या प्रेमाने....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action