STORYMIRROR

Prashant Shinde

Action Inspirational

3  

Prashant Shinde

Action Inspirational

वसंत पंचमी..!

वसंत पंचमी..!

1 min
4

वसंत पंचमी वसंत पंचमी म्हणताच

पंचांग नजरे समोर ठाकते

आणि नकळत थोडे अंतर

अजूनच आपोआप फाकते...

हा परिणाम ज्ञानाचा नाही तर

खऱ्या अर्थाने अज्ञानाचा आहे

याचाही विचार थोडा आता

करता आला पाहिजे....

देवी सरस्वतीचा जन्म दिवस

म्हणून वसंत पंचमी साजरी होते

ज्ञानाच्या रस्त्यावर पहिले पाऊल

आजच्या मुहूर्तावर पडते....

ज्ञान घेऊ इथून पुढे तरी

प्रत्येक बारीक सारीक गोष्टींचे

आणि खऱ्या अर्थांने मनोभावे

पूजन करू ज्ञान देवी सरस्वतीचे...

मागू हक्काने ज्ञान सात्विक

सृजनशील जीवन सरण्यासाठी

प्रगतीच्या वाटेवरती यशस्वी

उज्वल उन्नत्त समृद्ध होण्यासाठी....

आज वसंत पंचमी म्हणुनी

संकल्प करू ज्ञान संकलनाचा

वाचन लेखन श्रवण मनन चिंतन

करुनी जीवनी उचांक गाठू यशाचा....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action