STORYMIRROR

Prashant Shinde

Classics

3  

Prashant Shinde

Classics

धग.....!

धग.....!

1 min
5

धग....!

धग मागे ठेवुनी

गेला तो तप्त गोल

सारे शीत प्रयत्न

ठरले क्षणात फोल...

करपट तांबडे आकाश

काळवंडले निमिशात

गर्द काळी किनार

उमटली नभात....

ती वस्तू एकसंध

वाटे मज ठोकला जणू

एकरूप होऊनी होऊनी

काळे कभिन्न झाले अनुरेणू...

आस उद्याची उगाच

मागे स्थिरावते मनात

येईल पुन्हा तो तसाच

कोवळी किरणे घेऊनी अंगणात.....

तेंव्हा विसरेन मी सारे

सोसलेले दाह निखारे

म्हणेन वंदूनी प्रभुस मी

आहे मजवरी रे तुझे प्रेम खरे....!



विषय का मूल्यांकन करें
लॉग इन

Similar marathi poem from Classics