जरा थांबला असतास तर काय बिघडलं असत..?
ज रा थांबला असतास तर
रा न पेटलं नसतं
थां बण्याने तुझ्या
ब र का, जग बुडल नसतं...
ला ज वाटते माझी मला
अ चानक ढगाआड गेलास
स मजुतदार पणा सोडून
ता ठर पणे नजरेआड झालास...
स रळ कॅमेऱ्यात कैद करावे म्हंटले
त र गप्पकन गायब कशाला व्हायचं
र ग भरल्या मनाला का बरे असे
का रण नसता सतवायचं...
य दाकदाचीत थांबला असतास तर
बि गबाळीतून तुला टिपलोअसतो
घ वघवीत यशाच्या उन्मादात
ड रकाळी फोडीत पोष्ट केलो असतो..
लं गडी प्रयत्नांची घालण्या आधीच
अ सा तोल माझा घालवलास
स गळ्यांसमोर का बरे असे
त रतरीत नाक माझे कापलास...?
आता पुन्हा तुझ्यावर असा
विश्वास पोकळ मी ठेवणार नाही
तुझा फोटो काढण्या आधी
कधीच मनसुबा कोणता मनी ठेवणार नाही...!
©प्रशांत शिंदे,कोल्हापूर
8007740679