कैद...!
कैद...!
अठ्ठावीस फेब्रुवारी 2024..!
कैद....!
सहज पाहुनी
कैद केले तुला
विचारण्या ,असा कसा रे
चालला तू अस्ताचला...?
आयतेच मिळाले
कुंपण भोवती टाकण्या मला
आता कसा सांग वेड्या
भटण्याविना जाता येईल का तुला...?
अवती भोवतीची अभा
पाहू दे डोळे भरून मला
काय सौख्य मिळते बाबा
कसे शब्दात वेड्या सांगू तुला....!
असाच नित्य कैद होत जा
आनंद देण्या मला
नाही तरी वेळ आहे कुणा
माझ्या शिवाय पाहण्यास तुला...!