STORYMIRROR

Prashant Shinde

Action Inspirational

3  

Prashant Shinde

Action Inspirational

आज्ञाधारक...!

आज्ञाधारक...!

1 min
30

सत्तावीस फेब्रुवारी 2024...!

आज्ञाधारक....!

आज्ञाधारक तू मुक्त विहारी

फिरते सभोवती तुझ्या दुनिया सारी

मुखी घेता नाम हरी हरी

म्हणतोस तुही डोन्ट वरी डोन्ट वरी....

अस्तास जाता तू होतो अंधार

मनोमनी रुंजी घालतो गांधार

तुझ्यावरी सारी आमची मदार

तूच एकमेव रे आम्हा आधार....

प्रभात समयी आताशा

वाटतोस रे मज हवा हवा

मध्यांनी पण नकोसा होतोस मज

पाहुनी तुझा रे अवतार नवा...

सायंकाळी मग क्षितिजावरी

रेंगाळावेस वाटते रे तू मला

गर्द झाडी मधूनी पाहण्याची तुलाही

अवगत आहे ना रे उत्कृष्ट कला...!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action