STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Action

4  

Abasaheb Mhaske

Action

कोण फसवतं कुणाला ?

कोण फसवतं कुणाला ?

1 min
491

कोण फसवतं कुणाला ?

विचार स्वतःच्या मनाला 

जनाची नसेल कदाचित 

मनाची थोडी धरा...


विचार त्या संधीसाधू बगळ्याना

निर्लज्ज , बेफिकिरी टाळक्यांना

कुत्र्यागत तुटून पडणाऱ्या टोळक्यांना

अन त्या - त्यां टोळीच्या म्हेरक्याला 


दोष कुणाला कशास द्यावा ?

सारे पाप आपल्याच माथी 

आदर्शवादाची टिमकी वाजवत 

त्यांच्या पापात सहभागीही होतो 


त्यांनी सांगितलं कि भुंकतो 

त्यांनी सांगितलं कि कापतो 

ते समजतात पाळीव प्राणी 

आपण मात्र स्वामिनिष्ठ ... 


ह्यांच्यातले चोर त्यांच्यात थोर झाले 

नकळत ते कधी चोरावर मोर झाले 

आश्वासनाचा पाऊस , मोठं मोठी स्वप्ने 

मतांसाठी हात जोडून ,पाया पडून गेले 


भैय्या , दादा , भाई मिळून सारे

एकाच माळेचे मणी गड्यानो ....

कधी कुणाच्या ध्यानी आले ...

त्यांच्या भूलथापांनाच सत्य समजले 


संधीसाधू नेते , भ्रष्ट नोकरशहा 

हक्काबाबत उदासीन जनता 

महागाई , लोकसंख्यावाढ बेरोजगारी 

हाहाकार माजलाय चोहीकडे ....


सगळ्यांच्या हाताला काम मिळालय पण 

उदरनिर्वाहाचं काय ? कुणालाच सुचत नाही 

फोरजी मोबाईलवर भयाण वास्तव दिसत नाही

विकास नाचतोय चॅनलवर , आमच्या कानावर 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Action