STORYMIRROR

Prashant Shinde

Action Classics Inspirational

3  

Prashant Shinde

Action Classics Inspirational

लगबग

लगबग

1 min
3

वीस फेब्रुवारी 2024...!

लगबग...!

लगबग पहाट पारीची

पायात प्रकर्षाने जाणवते

ध्येय जणू 

पायांनाच खुणावते....

कोणी देव दर्शनास

तर कोणी शिकवणीस

कोणी उद्योगास

तर कोणी प्रभात फेरीस...

नित्य धडपड लगबग

सदैव सुरूच आहे

जो तो आपल्यापरीने

सदैव धावतोच आहे....

एक मात्र बरे झाले

प्रगतीचे वारे छान संचारले

देशभक्तीचे वातावरण निदान

थोडे तरी निर्माण झाले...

स्वतःपासून सुरुवात होऊन

चांगल्या युगाची नांदी झाली

एकजुटीची मशाल बाबांनो आता

प्रत्येकाच्या हृदयी पेटली...!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Action