STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Abstract Action

3  

Sanjay Raghunath Sonawane

Abstract Action

ए.पी.जे.अब्दुल कलाम (बालगीत)

ए.पी.जे.अब्दुल कलाम (बालगीत)

1 min
309

ए.पी.जे अब्दुल कलाम 

आमचा तुम्हा सदा सदा सलाम 

तुमच्या जन्माने वाढली भारताची शान 

तुमच्या जन्माने वाढला भारताचा अभिमान 


  गरीबीत जन्म तुमचा,परीस्थितीवर मात 

  शिकून भारताची तुम्ही उंचावली मान जगात 

  तुमच्या कार्याची आम्हां असते सदा ओढ 

  सुंदर व्यक्तीमत्व विश्वाची त्यास जोड 


रामेश्वरम पावन केली भूमी 

पवित्र तिर्थासमान आहे तिथे तुम्ही 

देव आम्ही तुमच्यात शोधला 

सत्यावरचा विश्वास आमचा वाढला 


देशाचे खरे संरक्षण योद्धा तुम्ही 

मिसाईलचे जनक, धन्य झालो आम्ही 

नवा नवा हट्ट तुमचा, उपक्रम शोधण्याचा 

नवे काही वाचावे हा ध्यास तुमचा 


   शोधक बुद्धी तुमची, शोध लावण्याचा 

   बालमनाचे हीत कायम जोपासण्याचा 

   भारताचे महान तज्ज्ञ, भारताचे शास्रज्ञ 

   धन्य झालो हो आम्ही तुमचे सदा कृतज्ञ 


महान लेखक, महान शिक्षक 

वृक्षप्रेमी तुम्ही बालमन शोधक 

तुमच्या सन्मानार्थ शब्द अपूर्ण 

भारताने गौरविले देऊन भारत रत्न 


  क्रांतीवीर तुम्ही, भारताची शान तुम्ही 

  भारताची मान जगात उंचावली तुम्ही 

   तुमच्या स्मरणार्थ वाचन प्रेरणा दिन 

  आंतरराष्ट्रीय ए.पी.जे.अब्दुल कलाम फाऊंडेशन 


सर्व भारतीयांना तुमचा अभिमान 

जाता जाता तुम्ही, गेले क्रांतीविचार पेरून 

जगात आम्ही शोधला भारताचा अनमोल हिरा 

रत्नांची खाण आमची, भारत देश खरा.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract