लता मंगेशकर-कविता
लता मंगेशकर-कविता


लता मंगेशकर नाव घराघराला
मातृभूमीच्या मातीच्या कणाकणाला
त्यांच्या कीर्तीचा डंका वाजला
भारतरत्न लाभले आपल्या देशाला
सूरांचे वेड लावले या दुनियेला
लाभली गान कोकीळा भारताला
दैवीशक्तीचा तो चमत्कार झाला
मधूर स्वर अजरामर हो झाला
कलाक्षेत्र त्यांच्या आवाजाने बहरले
जगात लता मंगेशकर नाव गाजले
तरूण,वृद्ध त्यांचे चाहते झाले
लता दीदींचे स्वर जगभर पसरले
राहील आठवण या मातृभूमीला
सूर्य,चंद्र,तारे आहे साक्षीला
<p>सूरांचा इतिहास कायम राहिला
आवाज सूरांचा जीवंत झाला
हृदयांचे गीत मनात बसले
या भूवर ते गुणगुणत राहिले
सूरांच्या मैफिलीत नैराश्य हरपले
दु:खी जीवनाला लढण्याचे शिकविले
राष्ट्रभक्ती,ऐक्यभाव सूरांनी शिकविला
राष्ट्रगान ऐकून देशप्रेमी एक झाला
भाषा,प्रांत,धर्म,त्यांच्या सूरांनी शिकविला
शब्द सूरांनी अखंड भारत जोडला
गाण्यांचा त्यांनी इतिहास रचला
जीवन वाहिले मानव कल्याणाला
दुर्लभ आवाज मिळाला भारताला
जगात दीदींनी अभिमान वाढवला