वचन
वचन
नित्य वचनाशी रहा
तुम्ही सारे प्रामाणिक
वचनपूर्तीत येती
अडथळे ते कितीक!!
दानशूर कर्ण वदे
हवे ते माग याचका
कवचकुंडले दिली
केली वचनपूर्तता
दशरथ राजा देई
कैकयीसी दोन वर
प्रिय पुत्र वनवासी
घाला पडे प्राणावर
प्राण गेला तरीसुद्धा
वचनाला नाही मागे
पूर्ततेला वचनाच्या
आत्यंतिक यत्न लागे
