STORYMIRROR

Suvarna Patukale

Abstract

3  

Suvarna Patukale

Abstract

का?

का?

1 min
203

का बरे घडते असे

ती वेळ ही सरल्यावरी

का साहूनी वारे असे

दमल्यापरी सुस्कारते

आधार ज्यांनी मज दिला

ते शब्दही झाले मुके

मी एकटी दुःखासवे

स्वप्नासही धिक्कारते

ते सोबती गेले पुढे

जखमांच देऊन अंतरी

जखमा पुन्हा भरल्या

कुणी खपलीतही नख सारते

ऊरी दाटतो हा हुंदका

दाटली आसवे जरी

वेदना झाल्या मना

त्या हसत मी स्विकारते

आता पुन्हा ती वेदना

जी गोठली होती कधी

वितळूनी आक्रंदली

का पापणी नाकारते. 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract