मला विसरू दे
मला विसरू दे
1 min
237
मला विसरू दे माझे मी पण
जीव शिव दोघे एकच आपण
यशोदा म्हणे माझा कान्हा
करांगुलीवर धरी गोवर्धन
गोप गोपिका त्याला भजती
देव देवता करीती पूजन
मला विसरू दे माझे मी पण
जीव शिव दोघे एकच आपण
नावे इतुकी रूपे अगणित
मूढ मी बसलो तुजला शोधीत
दिगंतात तू अंतरी व्यापून
हाक हृदयीची येतो ऐकून
मला विसरू दे माझे मी पण
जीव शिव दोघे एकच आपण
संसारतरु हा वदला केशव
फूल फळ देऊनी दिधले वैभव
हृदयी वसूनी प्रभूच सांगे
कर्म करा फळ करूनी अर्पण
मला विसरू दे माझे मी पण
जीव शिव दोघे एकच आपण
