पुरस्कार
पुरस्कार
1 min
52
लिहित गेले प्रेरणेतून
होत राहिले व्यक्व्ह नव्हते कोणी
लेखणीच होती फक्मत्रिण झाली सख्खी
सगळे सगळे लिहू लागले
काहीच नव्हते जव
शब्द माझ्यासाठी जागले
किती मोकळं वाटू लागलं
घुसमट थांबली जेव्हां
कळलं नाही लेखणीला
धार आली केव्हा
अर्थपूर्ण लिखाण झाले
आली मना उभारी
किमया केली लेखणीने
दिमाखात पुस्तक स्वारी
इतकं सुख नव्हतंच
कशातच मिळालं मला
साहित्याचे अंगणात
लेखन एक कला
मिळाले कौतुक आणि
शाबासकीची थाप
हेच मोठे पुरस्कार
पडली लेखनछाप
वाटलेच नव्हते मिळेल
पण पुरस्कार प्राप्त झाला
लिखाणाला माझ्या मग
अजून हुरूप आला
