STORYMIRROR

Suvarna Patukale

Others

4.0  

Suvarna Patukale

Others

आई जगदंबे

आई जगदंबे

1 min
293


दर्शन घेण्या आज धावले, देव ही ते भूवरी

आई जगदंबे हाक मारते, प्रकट इथे सत्वरी  //धृ//


शंभूच्या तेजे, मुख जाहले, बाहू विष्णु तेजे

इंद्राच्या तेजे मध्य जाहले, चरण ब्रम्हतेजे

अवतरली ही माया घेऊन सर्व तेज अंतरी

आई जगदंबे हाक मारते, प्रकट इथे सत्वरी  //1//


दैत्यवधाकारणे दिले तुज, शंखचक्र विष्णूने

इंद्र देतसे वज्र तुला, अन शक्ती दिली अग्नीने

महिषासुर मारण्यास आरूढ, झालीस सिंहावरी

आई जगदंबे हाक मारते, प्रकट इथे सत्वरी  //2//


दिव्यकुंडले, बाहूभूषणे, ग्रीवाभूषणे दिली

अस्त्र, शस्त्र, अन् रत्न ही तुजला, या देवांनी दिली 

तव कोपाने काळ कापतो, त्रिभुवन ही थरथरी

आई जगदंबे हाक मारते, प्रकट इथे सत्वरी  //3//


शतावधी असूरेही देवी, मारूनी तू टाकली

पाश बांधूनी ओढून खड्गे, गदेकरुनी ताडिली

नदीरक्ताची वाहू लागली, मिळली हो सागरी

आई जगदंबे हाक मारते, प्रकट इथे सत्वरी  //4//


Rate this content
Log in