STORYMIRROR

Suvarna Patukale

Romance

4  

Suvarna Patukale

Romance

पाऊस

पाऊस

1 min
276

रंग निळा आकाशीचा

दाटी मेघांची ही झाली

निळ्या नभाची निळाई

काळ्या ढगांनी का प्याली?

बघ रिमझिम सर

कशी धावूनिया आली

धरती ही सुखावली

मंद हसू तिच्या गाली

पानातून घुमे वारा

झुले फांदी वर खाली

पिके डोलताती सारी

धरा ओली चिंब झाली

का ग आतुरले मन

ओठांची ही वेडी लाली

केला शृंगार प्रीतीने

काया पावसात न्हाली


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance