STORYMIRROR

jaya munde

Romance

3  

jaya munde

Romance

जीवन एक संघर्ष - गजरा

जीवन एक संघर्ष - गजरा

1 min
231

केसांमंधी माळला मी सुगंधी मोगऱ्याचा गजरा,

*गजऱ्याला दृष्ट नका लावू राया करा खाली नजरा*..!!धृ!!


 तुमच्या पिरतीची अशी नशा भिनली,

अंगाअंगात जणू नागीण सळसळली.

या जवानीचा शृंगार माझा बाई हसरा.

*गजऱ्याला दृष्ट नका लावू राया करा खाली नजरा*..!!१!!


माझं रूप आलं असं ऐन भराला,

जसं टचकण पाड लागतो फळाला.

धुंदी नजरेत पिरमाची घेऊनशीनी करीते मुजरा,

*गजऱ्याला दृष्ट नका लावू राया करा खाली नजरा*..!!२!!


गजरा शोभतो शृंगाराचा होऊनी राजा,

तुमच्या साठी राया जीव वेडापिसा माझा.

रूप खुलूनी भाव मनी माझ्या नाचरा,

*गजऱ्याला दृष्ट नका लावू राया करा खाली नजरा*..!!३!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance