ऋतू
ऋतू
विषय -गारवा
शिर्षक-ऋतू हसरा
ऋतू हसरा नाचरा
लहरत जणू आला,
शिरशिरी अंगावरी
असा गारवा शिवला...
थंडमय थंडी अशी
दात दातावरी भारी,
गरमीची ऊब प्यारी
अंगी रजई,चादरी...
गारव्याचे गाणे ओठी
स्मरतात थंड थोडी,
शेकोटीची आठवण
विसरून सारी कोडी...
गारवा अंगात भिरता
भान सारे हरपले,
धुंद तन,मन होता
रम्य दृश्य चमकले...