STORYMIRROR

jaya munde

Comedy

3  

jaya munde

Comedy

हास्य कविता

हास्य कविता

1 min
329

 एकदा काय झालं

 गोंधळ,गडबडीत,

 शाळेला निघाले मी

  घाईगडबडीत...


  धावतपळत आले

  प्रार्थनेला उभी राहीले,

  एकमेकांकडे पाहूनी

   सर्व मुले हसू लागले...


   काही मला समजेना

   काय झालं ते कळेना,

   खो-खो आवाज आता

  काही केल्या कमी होईना...


    जो-तो माझ्या पायाकडे

    खुणावून एकदूसऱ्याला,

    काय करावे समजेना

     छडी घेऊन मारण्याला...


    बाई तुमचे पाय

    शब्द कानी पडले,

    चूर लाजण्याचे हास्य

    मनोमनी खजिल झाले...


    असेकसे झाले कळेना

    चप्पल दोन वेगवेगळ्या,

    आजही हसू आवरत नाही

    आठवूनी घटना सगळ्या...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy