STORYMIRROR

Ajay Chavhan

Comedy

3  

Ajay Chavhan

Comedy

सपन...

सपन...

1 min
270


काल रातच्यानं मले

एक सपन पडलं ।

मले मने माह्यी जानु

नातं तुह्याशी जोडलं ।।

जाम झालो खुश तवा

उड्या मारत बसलो ।

कवा नसन एवढा

भावा असन हसलो ।।

माह्या हात तिच्या घट्ट

हातामधी होता जवा ।

गुदगुल्या होय मले

आंग माह्ये हाले तवा ।।

हाय मनलं पिरेम

तिनं माह्यावर लई ।

आयकुन मले जाग

आली झोपेतून तई ।।

मंग आलं माह्या ध्यानी

झालं जानुचं लगीन ।

कोण्यातरी परक्याची

हाय बनली वाघीण ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy