STORYMIRROR

Ajay Chavhan

Romance

3  

Ajay Chavhan

Romance

सपन.....

सपन.....

1 min
278

काल राजेहो रातच्यानं

सपनात आली माह्यी जानु ।

सांग म्हणे पोरा तुले

माह्या लवर कसं मानू? ।।


म्या म्हणलं तिले सांग ओ...

तुह्यासाठी मी काय करू? ।

सांग आताच तुह्या भांगेत

माह्या हातानं कुंकू भरू? ।।


दिसते तुह्या डोयामंधी

पिरेम मले माह्यासाठी ।

म्हणूनच या गल्लीत रोज

चकरा मारतो तुले पाहासाठी ।।


सांग खरं खरं मले तू

पिरेम करतं की नाई माह्यावर? ।

माह्य पोरी लयच ना ओ...

जीव हाय ना तुह्यावर ।।


ती म्हणली मग मले पिरमानं

माह्या तं हाय तू जीव की प्राण ।

लवकर तयारी करून माह्याघरी

आपल्या लगीनाची वरात आन ।।


झालो तवा मी जाम खुश

झोपेतच मी हसू लागलो ।

उठून माह्या जानुले मी

इकडे तिकडे पाहू लागलो ।।


हे सपन होतं मले कयल्यावर

म्या केली देवाले एकच मागणी ।

जिच्यावर करतो पिरेम मी खरंच

तिलेच बनवजो माह्यी साजणी ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance