STORYMIRROR

Rekha Gavit

Romance

3  

Rekha Gavit

Romance

तुझ्या विरहात...

तुझ्या विरहात...

1 min
295

सखे, साश्रु नयनी तुझ्या आठवणीत

जागवल्या त्या रात्री किती?

मनाची घालमेल ,राहिली ना आता भीती

घेतल्याचा त्या आणाभाका साथ देत


गायले होते ते संसाराचे मधुर गान

चाललो ती सप्तपदी पावलोपावली

तुझ्यासवे मी तुझी गर्द सावली

तुझ्या आठवणीत रम्य विसरलो मी भान


सांग तुला आठवतात का, रम्य त्या रात्री?

कळी उमलली तुझ्या या उदरी

चित्र समोर उभे अजूनही या नेत्री

जीवनाची ही अनमोल शिदोरी


विसरून जाऊ जुने ते पुराणे

सोबतीने चल गाऊ नव्याने जीवनगाणे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance