पाऊस...
पाऊस...
1 min
279
वर्षाराणी येता हर्ष झाला मनी
नटून सजून जमले सारे वनी
चातक,पावशा आणि साद घाली तो मयूर
पावसाची वाट पाही धरणीवरील चराचर
घन बरसती ,करी आवाज गडगडाट
सागरास येई आनंदे भरती अन् लाट
वनदेवी नटली हिरवा शालु लेवुन
धारा झेलते मी ओंजळ पसरवून
झाडेझुडपे, प्राणी ,पक्षी सारी धरतीची लेकरे
आला पाऊस मग आनंदून गेली सारे
