STORYMIRROR

Rekha Gavit

Inspirational

3  

Rekha Gavit

Inspirational

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

1 min
262

संविधान आहे आम्हा जरी आधार

दे साथ पुन्हा समानतेसाठी

भिमाईच्या पोटी परत घे जन्म

धम्म दर्शनाचे सत्व जाणण्यासाठी!!१!!


महामानवा ,महानायका ये परत

 मानवता ,सहिष्णुतेचा देण्या नारा

गर्जना होवू दे अजूनही जोरात

शिका,संघटित व्हा अन् संघर्ष करा!!२!!


तम संपवूनी ने आता ज्योतीकडे

झोपलेली रयत आता जागते

संविधान हे तळपते शस्त्र घेऊनी

हातातील लेखणी ती शब्दधार मागते!!३!!


बाबासाहेब नाद जगती पुन्हा घुमेल

क्रांती सूर्य गगनी मग तळपेल

रक्षण ते होईल दीनदुबळ्यांचे

भारतभू होईल सुफल अन् सफल!!४!!


युवा पिढी ध्यास घेई शिक्षणाचा

वाचनाने समृद्ध होईल जीवन

प्रगतीच्या मार्गाने जाईल पुढे पुढे

तरूणाई समृद्ध होईल जणू नवीन!!५!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational