आई
आई
आई म्हणजे आपली ईश्वर!
तिचे अनंत उपकार!!
करते आपले प्रत्येक स्वप्न साकार!
तिला माझा साष्टांग नमस्कार!!
श्वासासम जपे लेकरू उदरी !
सदैव असते मायेची शिदोरी!!
पहिली गुरू असता, दुर्लक्षिते लक्ष चुका!
प्रेमरूपी ज्ञानाने तू घडविते घडा!!
सागरासम विशाल मन तुझे!
आयुष्यभर ओढते संसाराचे ओझे!!
मुलांसाठी करते, सर्व काही!
म्हणते माझे सर्वस्व , तुमची स्वप्ने!!
आई थोर तुझे उपकार!
दिला तु मज ज्ञानरुपी आकार!!
जाई, जुई, गुलाब, मोगरा!
आई माझी, पुष्परूपी झरा!!
नित्य स्मरे तुझी अंगाई!
किती महती सांगु तुझी आई!!
अपूर्ण पडेल, आकाशमय पान, समुद्राची शाई!
तूच तुज सम आई!!!
